त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यक्रमात प्राजक्ता माळी नृत्य सादर करणार नाही, समोर आलं मोठं कारण - prajakta malis performance at mahashivratri 2025 trimbakeshwar canceled know the reason
prajakta malis performance at Trimbakeshwar canceled: त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्यकला सादर न करण्याचा निर्णय प्राजक्ता माळीनं घेतला आहे.

या कार्यक्रमाला प्रसिद्धी न देण्याचं ठरवलं होतं. मात्र काल या कार्यक्रमाची नको त्या कारणामुळं चर्चा झाली. त्यामुळं कार्यक्रमाची मोठी प्रसिद्धी झाल्यानं तिथं आता गर्दी होण्याची शक्यता आहे, या सुरक्षेच्या कारणास्तव मी यासोहळ्यात नृत्यकला सादर करणार नसल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाली प्राजक्ता माळी?
मंदिराच्या प्रांगणाचं क्षेत्रफळ पाहता किती जणं बसू शकतात, याचा विचार करूनच या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली नव्हती, आता अवास्तव गर्दीची भीती, काळजी प्रशासनाला वाटतेय.त्यामुळं मी माझ्या कुटुंबियांशी बोलून मी हा निर्णय घेते की, कमिटमेंट आहे म्हणून तो कार्यक्रम सादर होईल, पण माझ्या शिवाय.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यक्रमात प्राजक्ता माळी नृत्य सादर करणार नाही, समोर आलं मोठं कारण
अर्थातच यानं माझ्या आनंदावर विरजण पडणार आहे, परंतू वैयक्तिक सुखापेक्षा प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये, ही बाब मला जास्त महत्त्वाची वाटते आणि मोठी वाटते. त्यामुळं सर्वस्वी हा माझा निर्णय आहे. अर्थातच जिथे भाव असतो तिथे देव असतो. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कुठेही बसून शिवाची आराधना केली तरी ती शिवार्यंत ती पोहोचणारच आहे, असंही प्राजक्तानं म्हटलं आहे.
माजी विश्वस्तांचा विरोध
प्राजक्ताच्या ‘शिवार्पणमस्तु’ हा नृत्याच्या कार्यक्रमाला माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. या वादाच्या संदर्भात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर मंडलाच्या अधीक्षकांनीही ट्रस्टच्या अध्यक्षांना पत्र देऊन अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याची अनुमती घेणं आवश्यक असल्याचे म्हटलं होतं. अशा प्रकारे विनापरवानगी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं हे एएमएएसआर कायदा, १९५८ व त्याचे नियम,१९५९ चं उल्लंघन असल्याचे पत्रात नमूद होतं.