Utkrushtha Mahila Manch Events । "उत्कृष्ट महिला मंचचा भव्य सोहळा: नृत्य, फॅशन आणि सक्षमीकरणाचा संगम"

Utkrushtha Mahila Manch Events

Utkrushtha Mahila Manch Events : चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्कृष्ट महिला मंच तर्फे इंदिरा गांधी नाट्य सभागृहात भव्य दिव्य समूह नृत्य स्पर्धा आणि कपल फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. प्रेरणा कोलते यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला तसेच उत्कृष्ट महिला मंचच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. Group Dance Competition

आश्रमशाळेतील शिक्षकांच्या समस्या सुटणार

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभावती एकुरके (पोलीस निरीक्षक, सिटी पोलीस स्टेशन) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या सुरक्षेविषयी महत्वपूर्ण माहिती दिली तसेच उत्कृष्ट महिला मंचच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. International Women’s Day Events

international woman's day events

कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये

उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा माजी नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम पार पडला. स्पर्धेमध्ये महिलांच्या आधुनिक पेहरावासह विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले. विशेषतः 70 वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग आणि जेष्ठ नागरिकांचा कपल फॅशन शोमध्ये सहभाग हा या स्पर्धेचा मुख्य आकर्षण ठरला. Women Empowerment Events 2025

group dance competition

स्पर्धेचे विजेते

समूह नृत्य स्पर्धा:

🥇 वुमनिया डान्स ग्रुप₹11,000 रोख व मानचिन्ह
🥈 गृही गर्ल्स डान्स ग्रुप₹7,000 रोख व मानचिन्ह
🥉 डॅझ क्रीव डान्स ग्रुप₹5,000 रोख व मानचिन्ह
🔹 12 संघांना ₹2,000 रोख व प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

कपल फॅशन शो स्पर्धा:

🥇 रोहित-सुरभी गाडगे₹10,000 रोख व मानचिन्ह
🥈 अर्जुन-मल्लिका कावळे₹7,000 रोख व मानचिन्ह
🥉 प्रशांत-माधवी घोडमारे₹5,000 रोख व मानचिन्ह
🔹 10 जोडप्यांना ₹2,000 रोख व प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

स्पर्धेचे परीक्षक

▪️ समूह नृत्य स्पर्धा – रत्नाकर शेळके, आशुतोष पाटील, किरण बल्की, सारिका भुते
▪️ कपल फॅशन शो – केतन अरमरकर, स्मिता जावडे, सारिका भुते, प्रणिता जुमडे

प्रमुख उपस्थित मान्यवर

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सौ. कल्याणी किशोर जोरगेवार, डॉ. सुशील मुंदडा, प्राध्यापक संजय बेले, राजेंद्र भाऊ रघाताटे, अमित राव (पारस डेव्हलपर्स), मंजुश्री कासमगोटूवार उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन वैशाली कन्नमवार व धनश्री मुसने यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साक्षी कार्लेकर, स्नेहल बांगडे, मनीषा कन्नमवार, अर्चना चहारे, माया खानके, जयश्री साखरकर, मनीषा भाके, मंगला रुद्रपवार, योगिता धनेवार, अभिलाषा मैदळकर, छाया चवरे, कल्पना बडी, वैशाली कांमडे, सुषमा बेले, चंदा घोडमारे, शालिनी राऊत, रजनी हरणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष छबुताई वैरागडे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार मानले तसेच भविष्यात महिलांसाठी आणखी नव्या उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.

Source link