राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित लातूर ग्रंथोत्सव निमित्त लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत आदिवासी पारंपारिक नृत्य सादर करु
.
या ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ज्येष्ठ विचारवंत तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे म्हणाले, ग्रंथासारखा दुसरा मित्र नाही. या जगात ज्याला कोणी नाही, त्याच्या पाठीशी ग्रंथ उभे राहतात. ग्रंथामध्ये ज्ञानाचे झरे असतात, ज्यांना ज्ञान मिळवायचे आहे, त्यांनी ग्रंथालयात जायला हवे. ‘लातूर ग्रंथोत्सव २०२४’चे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ग्रंथालय संघाचे कार्यवाह राम मेकले, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे, कालिदास माने, साहित्यिक डॉ. जाधव, यांची उपस्थिती होती.