The Yatra Festival concluded with a state-level dance competition. | राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेने झाली यात्रा महोत्सवाची सांगता: लातूर, बीड, सातारा, सांगली, सावंतवाडी, तुळजापुरातील स्पर्धकांचे पहाटे चारपर्यंत सादरीकरण‎ - Dharashiv News

येथील महाशिवरात्रीयात्रा महोत्सवानिमित्त रविवारी (दि. २) आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी विविध प्रकारच्या गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. चार दिवस विविध कार्यक्रम झाल्यानंतर

.

उद्घाटन लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, अभिमान खराडे, माजी सरपंच शंकर जट्टे, नगरसेवक अविनाश माळी, दत्ता निर्मळे, श्रीकांत भरारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेत लावणी, देशभक्ती गीत, रिमिक्स, हिंदी मराठी गाण्यांसह विविध कलाप्रकारावर सादर करण्यात आले. स्पर्धेत लातूर, बीड, सातारा, सांगली, तुळजापूर, सावंतवाडी, उमरगा यासह अनेक ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले. रात्री साडेनऊच्या सुमारास स सुरू झालेली ही स्पर्धा मंगळवारी पहाटे चारपर्यंत चालली. आस्था डांगे, अंबेजोगाई, शौर्या गोडबोले लातूर, जान्हवी कसबे लातूर, समृद्धी तिपणे सोलापूर, पायल पाटील सांगली आदींनी बहारदार नृत्य सादर केले. तसेच राजमुद्रा ग्रुप उमरगा, भवानीशंकर तुळजापूर, आरडीएक्स सावंतवाडी, डीडीएस पंढरपूर, कलाविश्व लातूर या डान्स ग्रुपने सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. सामूहिक गटाच्या सादरीकरणावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. परीक्षक म्हणून शुभम मलेलू, निलेश हतांगळे, सुरेश वाघमोडे यांनी काम पाहिले. यशस्वितेसाठी यात्रा कमिटीने परिश्रम घेतले. रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी महिला, नागरिक, युवक व परिसरातील प्रेक्षक उपस्थित होते.

वैयक्तिक (लहान गट) प्रथम – आस्था डांगे, अंबेजोगाई द्वितीय – शौर्या गोडबोले, लातूर तृतीय (विभागून) – जान्हवी कसबे, लातूर व समृद्धी तिपणे, सोलापूर वैयक्तिक (मोठा गट) प्रथम – अनामिका अहिरे, बीड द्वितीय (विभागून) – पायल पाटील, सांगली व सृष्टी जाधव, सातारा तृतीय (विभागून) – सानिका भागवत, सातारा व करन लांडगे, लातूर युगल जोडी गट ( जोडी) प्रथम – सुमित व आरती सातारा द्वितीय – पुष्कर व विशाल नाशिक तृतीय – अनामिका व अंकिता बीड सामूहिक (लहान गट) प्रथम – जी बी ग्रुप लातूर द्वितीय – ऑसम डान्स अकॅडमी लातूर तृतीय (विभागून) – के के ग्रुप लातूर व बीएमके ग्रुप माढा सामूहिक (मोठा गट) प्रथम – राजमुद्रा ग्रुप उमरगा द्वितीय (विभागून) – भवानीशंकर तुळजापूर व आरडीएक्स सावंतवाडी तृतीय (विभागून) – डी डी एस पंढरपूर व कलाविश्व लातूर

Source link