रत्नागिरी : आंबेशेत घोसाळेवाडी येथे २१ मार्च रोजी भव्य पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरीतील आंबेशेत घोसाळेवाडी येथे सालाबाद प्रमाणे शिमगा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. २१ मार्च रोजी हा उत्सव साजरा होत आहे. या शिमगोत्सवाचे प्रमुख आकर्षण पालखी नृत्य स्पर्धा असणार आहे. या शिमगोत्सवानिमित्त भव्य पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या पालखी नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट पालखी नृत्य पारितोषिक म्हणून प्रथम क्रमांकाचे २१ हजाराचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. शिमगोत्सवानिमित्त प्रत्येक गावची ग्रामदेवता भक्तांच्या भेटीला मंदिरातून बाहेर पडली आहे. या निमित्त गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आंबेशेत येथील घोसाळेवाडी येथे देखील मागील अनेक वर्षे शिमगोत्सवात पालखी नृत्य उत्सवाचे आयोजन करण्याची परंपरा जोपासली गेली आहे.
या वर्षी २१ मार्च रोजी हा पालखी नृत्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिवशक्ती मित्रमंडळ रत्नागिरी आंबेशेत घोसाळेवाडी यांच्याकडून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी शिमगोत्सवात या नृत्य उत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा उत्सव येथील शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य समजले जाते. दरवर्षी हजारो भाविक या पालखी उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी घोसाळेवाडी आंबेशेत येथे हजेरी लावतात. या वर्षी पालखी नृत्य पारितोषिक देण्यात येणार आहे. या नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक २१००० व चषक, द्वितीय १५००० व चषक, तृतीय ११००० रोख बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. या पालखी नृत्य स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक मंडळांनी नियम व अटी जाणून घेण्यासाठी अनिल घोसाळे 9421603603, अमोल घोसाळे 9067818481, अमित घोसाळे 9356008616, शैलेश झापडेकर 9527473717 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. पालखी मैदानातील रिंगणात खेळवण्याची अट असेल. इतर नियम व अटी आयोजकांकडे उपलब्ध असतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 17-03-2025
