Sindhi Symphony Band, dance and cultural programs organized | पुण्यात रविवारी चेटीचंड महोत्सव: सिंधी सिम्फनी बँड, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन - Pune News
सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७५ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. ३० मार्च) हा महोत्सव डेक्कन कॉलेज बँक्वेट हॉल, डेक्कन कॉलेज ग्राउंड, बॉम्बे सॅपर्स जवळ
.
अशोक वासवानी म्हणाले, चेटीचंड महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे. सायंकाळी ७ वाजता भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होईल. मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभम नाथानी, प्रियांशी कर्वाणी, रीतिका सुंदरानी, अमान सुंदरानी व मोहित शेवानी यांच्यासह १७ गायक कलाकारांसह देवांश एंटरटेनमेंट प्रस्तुत सिंधी सिम्फनी बँड, सिंधी ऑर्केस्ट्राचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानी कार्यक्रम संचालित करणार आहे. जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण होणार आहे.
या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मिलेनियम सेमीकंडक्टर्स इंडियाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हरेश अभिचंदानी असणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील चार हजार अधिक सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी होतील. सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. सिंधू सेवा दल गेली ३८ वर्ष कार्यरत आहे,असे सुरेश जेठवानी यांनी नमूद केले.