'सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटात सुबोध भावे आणि मानसी नाईक यांची अभिनय-नृत्य जुगलबंदी! - SAKAL TAR HOU DYA
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीत प्रतिभावंत कलाकारांचे आशयघन चित्रपट बनत असतात त्यामुळं अमराठी लोकांना अर्थपूर्ण चित्रपट काढायचे असतात तेव्हा त्यांची पाऊलं आपसूक मराठीकडं वळतात. गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमधील अनेक नामवंत लोकांनी मराठी चित्रपटनिर्मितीत रस घेतला. आता त्यात अजून भर पडतेय ती म्हणजे प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते विनय सिन्हा यांच्या कन्या नम्रता सिन्हा यांची. त्या आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहेत. त्या ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाची निर्मिती करीत असून त्याचे शूटिंग इंदूर आणि आसपासच्या परिसरात सुरु झाले आहे.
‘सकाळ तर होऊ द्या’ असं अनोखं नाव असलेल्या चित्रपटात सुबोध भावे आणि मानसी नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत तंत्रज्ञांची साथ मिळणार असून हा चित्रपट श्रेय पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होत आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आलोक जैन यांनी केलं आहे, संवादलेखनाची जबाबदारी ओंकार बर्वे यांनी सांभाळली असून डीओपी आहेत छायाचित्रकार सुनील पटेल ज्यांनी ‘सरफरोश’, ‘रेडी’, ‘हम तुम’, ‘मेरे यार की शादी है’, ‘बँग बँग’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांसाठी काम केलं आहे.
मध्यप्रदेशातील अद्भुत, अनोख्या आणि दुर्मिळ लोकेशन्सवर चित्रीकरण सुरु झालं असून चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या मते, या लोकेशन्सची निवड ही कथेशी संलग्न आहेत. याचं कथानक फक्त दोन व्यक्तिरेखांवर आधारित असून सुबोध भावे आणि मानसी नाईक पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. सुबोध भावे यांचा दर्जेदार अभिनय आणि मानसी नाईकचं अप्रतिम नृत्य आणि अदाकारी यामुळे प्रेक्षकांना वेगळी अनुभूती मिळण्याची शक्यता असेल.
चित्रपटाचे दिग्दर्शक आलोक जैन यांनी सांगितलं की, “चित्रपटातील कथा प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देईल. चित्रपटाचे शीर्षक जसं हटके आहे, तसंच त्याची मांडणी आणि लूकही तितकाच अनोखा असणार आहे. फक्त दोन व्यक्तिरेखा असूनही, चित्रपटात थरारक वळणे, उत्कंठावर्धक प्रसंग आणि संगीतमय प्रवास असंल, जो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवंल.”
हेही वाचा –