Maharashtra Budget 2025 Eknath Shinde said manifesto for five years comment on Ladki Bahin Yojana
मुंबई : महाराष्ट्र सरकारचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पानंतर सत्ताधारी पक्षाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाष्य केलं. विरोधी पक्षांकडून वाढणार कधी , वाढणार कधी, वाढणार कधी हा प्रश्न केला जातोय, मात्र वचननामा पाच वर्षांचा असतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवला आहे. आम्ही आधुनिक शेतकरी आम्ही समोर आणतोय. आमच्या सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पांना 150 सुप्रमा दिल्या. तर मविआच्या काळात केवळ 3 सुप्रमा दिल्या गेल्या. अनेक सिंचन प्रकल्प मविआने बंद केले आम्ही पुन्हा सुरु केले.सोलरवर वीज देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, असं एकनाथ सिंदे म्हणाले. पर्यटनाला देखील चालना दिली आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे लाडकी बहीणवर काय म्हणाले?
महिलांसाठी देखील निधी देतोय. 36 हजार कोटी रुपयांचा खर्च मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी दिला आहे. आमचा वचननामा प्रिंटिंग मिस्टेक नाही. विरोधी पक्षांना बोलायला काही जागा ठेवली नाही. ते वाढणार वाढणार कधी करत आहेत. मात्र, वचननामा पाच वर्षांसाठी असतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 5 वर्षांचा वचननामा आहे, आम्ही करतोय आणि देणार असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्हाला महिलांना लखपती करायचं आहे. 26 लाख महिलांना लखपती करणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना करतोय. कुठलाही विभाग बाकी ठेवलेला नाही. दिव्यांगांसाठी प्रयत्न करतोय, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक : नाना पटोले
महायुतीचा अर्थसंकल्प मी दाखवतोय. सरकारने जाहिरनामा जो निवडणुकीत दिला होता त्याचा पहिल्या बजेटमध्ये उल्लेखही नाही.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी गोलगोल आणि शेरोशायरीतच बजेट मांडलं. कुठून पैसे येणार कुठे खर्च होणार याचा उल्लेख नाही. ४७ टक्के पैसे मागच्या वेळचे खर्च झाले नाहीत. संकल्प पत्रात ३ लाखाचे कर्ज माफ करण्याचं उल्लख झालेला नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं सागितलं त्याची फसवणूक केली आहे. रोजगार निर्मितीची कुठलिही घोषणा नाही. महागाई कमी करणयापेक्षा महागाई वाढवण्याचं ठरलंय, असं नाना पटोले म्हणाले.
इतर बातम्या :
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray Meet: ना एकमेकांकडे पाहिलं, ना नजरेला नजर, ठाकरे-शिंदे पहिल्यांदाच समोरा-समोर, PHOTO
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाही, फडणवीस-ठाकरेंचं हस्तांदोलन!