Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये मिळणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana: महायुती सरकारची महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपेड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे विधान केले आहे. माहायुती सरकार सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे अश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. परंतु सरकार सत्तेत येऊनही अद्याप लाडक्या बहिणींच्या लाभाची रक्कम 1500 हून 2100 रुपये करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात यासंदर्भात घोषणा होईल अशी लाभार्थी महिलांना अपेक्षा होती. पंरतु सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
दरम्यान आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही असा प्रश्न सतत उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल आणि लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रूपये देवू, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. लाडक्या बहिणींना सध्या प्रत्येक महिन्यात 1500 रुपयाचे आर्थिक सहाय्य केले जाते. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
अजित पवार विधानसभेत बोलताना काय म्हणाले?
लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले की, “आम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार नाही, असे आम्ही म्हणालेलो नाही. आम्ही देणार आहोत. पण कधी द्यायचे हे एकंदरीत राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही नक्की देऊ. सगळी सोंग करता येतात मात्र पैशांचं सोंग करता येत नाही. सध्या आम्ही ठरवल्याप्रमाणे 1500 रुपये देत आहोत आणि पुढचीही रक्कम देण्यासंदर्भात आर्थिक परिस्थीती सुधारली की ती देऊ.”
अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेलल्या महिलांसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील दोन महिलांना राज्य सरकारकडून दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. आतापर्यंत एकूण 9 हाफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. अर्थसंकल्पात लाभाची रक्कम 2100 रुपये होईल अशी लाडक्या बहिणींना अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे या योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.