लाडकी बहीण योजनेच्या नियमांची पडताळणी आता केली जात असून पात्र बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आता मंत्री अदिती तटकरे यांच्या जिल्ह्यात तब्बल 15 हजार लाडक्या बहिणी योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. कागदपत्रांच्या त्रुटीमुळे हे अर्ज बाद झाले आहेत. तर रायगड जिल्ह्यातील 61 महिलांनी स्वत:हून अर्ज मागे घेतले आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
एकीकडे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे छाननी करताना मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची संख्या कमी होत असल्याचं बघायला मिळत आहे.