Gautami Patil : भर कार्यक्रमात गौतमी पाटील तरूणाला म्हणाली I Love You! एका फटक्यात तरूण क्लीन बोल्ड, पुढे जे झालं...
Last Updated:
Gautami Patil : धाराशिव जिल्ह्यातील हिप्परगा रवा गावात गौतमी पाटीलच्या नृत्य कार्यक्रमात एक तरुण १०० फूट झाडावर चढून डान्स पाहत होता.
मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा गावात नुकतीच ग्रामदैवत श्री नरसिंहाची यात्रा पार पडली. यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्यांनी लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गौतमीचा डान्स बघण्यासाठी हजारोंची गर्दी उसळली होती. मात्र, या कार्यक्रमात घडलेल्या एका अनोख्या प्रसंगामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे.
गौतमीच्या डान्ससाठी १०० फूट झाडावर चढला तरुण!
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तरुण वर्ग प्रचंड पसंती देतो. अनेकदा तिच्या डान्सला पाहण्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. हिप्परगा रवा गावातही असंच काहीसं घडलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने, एक तरुण १०० फूट उंच झाडावर चढून टॉर्चच्या प्रकाशात गौतमीचा डान्स पाहत होता!
झाडावर बसून हा तरुण कार्यक्रमाचा आस्वाद घेत होता, पण त्याच्याकडे पाहून उपस्थित प्रेक्षकांसह आयोजकही चकित झाले. इतक्या उंचीवर बसल्याने त्याचा जीव धोक्यात असताना देखील, तो नृत्य पाहण्यात रममाण झाला होता!
गौतमीने डान्स थांबवला आणि…
कार्यक्रमाच्या दरम्यान अचानक गौतमी पाटीलच्या नजरेस तो तरुण झाडावर बसलेला दिसला. तिने नृत्य तिथल्या तिथे थांबवत थेट त्या तरुणाला उद्देशून “दादा, आय लव यू… खाली उतरा” अशी प्रेमळ विनंती केली!
गौतमीच्या या शब्दांनी संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रेक्षकांमध्ये जल्लोष सुरू झाला, तर काहींनी तरुणाकडे पाहून टाळ्या वाजवायला सुरुवात केली. गौतमीच्या तोंडून “आय लव यू” ऐकताच तरुणाचा थरकाप उडाला आणि तो पटकन झाडावरून खाली उतरला!
गौतमीच्या एका वाक्याने चर्चा रंगली!
गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि अनेकदा गोंधळसुद्धा उडतो. मात्र, या वेळी गोंधळाचा कारण वेगळं होतं, ते म्हणजे तिचं “आय लव यू” म्हणणं!
यात्रेनिमित्त आयोजित या कार्यक्रमाची संपूर्ण जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. गौतमी पाटीलच्या ‘आय लव यू’ वर तरुण खाली उतरतो, पण तिच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण गावात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Mumbai,Maharashtra
March 31, 2025 1:16 PM IST
भर कार्यक्रमात गौतमी पाटील तरूणाला म्हणाली I Love You! एका फटक्यात तरूण क्लीन बोल्ड, पुढे जे झालं…