नवरात्रीत का खेळला जातो गरबा आणि दांडिया? तुम्हालाही माहिती नसेल याचं कारण
Importance of Dandiya: शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. या दिवशी लोक दांडिया आणि गरबा खेळतात आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. पण तुम्हाला माहित आहे का दांडिया आणि गरबा फक्त नवरात्रीतच का खेळला जातो? महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सादर होणाऱ्या या लोकनृत्याचा थेट संबंध आई दुर्गाशी आहे. वास्तविक गरबा आणि दांडिया या खेळांचा उगम गुजरातमधून झाला. पण देवीचे भक्त देशभरात आहेत, त्यामुळे नवरात्रीच्या काळात देशभरात सामूहिक नृत्यांचे आयोजन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार ही नृत्ये फक्त नवरात्रीतच केली जातात.