मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2025-26 च्या खर्चासाठी 36000 कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेबाबत ज्या घोषणेची प्रतीक्षा सर्वजण करत होते ती मात्र अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्यासंदर्भातील घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. त्यावरुन महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांबाबत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
लाडक्या बहिणींसाठी निधी कमी पडणार नाही, असे नियोजन केले गेले आहे. याशिवाय या योजनेतून बहिणी आर्थिक स्वावलंबी व्हावेत असे नियोजन आहे. काही बहिणींनी या पंधराशे रुपयांतून सोसायटी स्थापन केल्या. या सोसायट्यांचे जाळे निर्माण करून, राज्यस्तरीय अपेक्स अशी सोसायटी स्थापन केली जाईल.कुठलिही योजना तयार होते तेव्हा गृहितक असतं. आपल्याला योजनेसाठी किती पैसे लागणार ते वर्षभरानं समजतं. गेल्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर ठेवले आहेत. वाढवायची गरज पडल्यास, जुलै, डिसेंबर आणि मार्चमध्ये वाढवता येतात.2100 रुपयांबाबत काम चालू आहे, शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं महत्त्वाचं आहे आणि आपली घोषणापण पूर्ण करायची आहे. ट्रेंड चांगले आहेत. आपल्या योजना शाश्वत पद्धतीनं चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त ठेवावी लागेल. 3 टक्क्यांच्या वर जाता येणार नाही.आता आपण मागच्या वर्षी 2.9 टक्क्यांपर्यंत गेलो होतो ते 2.7 टक्क्यांपर्यंत आलं होतं. एप्रिल महिन्यात 1500 रुपये मिळतील. जेव्हा आम्ही घोषित करु की पुढच्या महिन्यापासून 2100 देऊ तेव्हापासून देऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी किती तरतूद?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना 33 हजार 232 कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुदानाचा उपयोग करणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेणार असं सरकारनं म्हटलंय.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याची हप्त्याची रक्कम 1500 रुपये असणार हे स्पष्ट झालं आहे.
https://www.youtube.com/watch?v=qacwQuz0HA0
इतर बातम्या :
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Budget 2025 : मोठी बातमी : लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीच, बजेटमध्ये 36 हजार कोटींची तरतूद, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
अधिक पाहा..