शहरातील जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात विविध अदाकारीने नृत्य आणि संगीतमय कार्यक्रमात उपस्थित भारावून गेले.
.
उद्घाटन सुनीताताई सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे, माजी नगरसेवक संदीप खरात, कुमार रुपवते, दिनेश काकडे, रामेश्वर मुळक, संतोष जिगे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष सिध्देश्वर उबाळे यांनी शाळेतील वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षपदी शोभाताई वाघराळ यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामेश्वर मुळक, जगन दुर्गे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
विविध कला गुणांचे केले सादरीकरण चिमुकल्यांनी ओ माय फ्रेंड गणेशा, आमच्या पप्पांनी गणपती आणला, माय भवानी, ओम साई राम, आरंभ है प्रचंड, मेरे पापा, आम्ही शिवकन्या, मुकुंदा मुकुंदा, खंडेरायाच्या लग्नाला, आय लव माय इंडिया, कुरया चालल्या रानात, लल्लाटी भंडार, वंदे मातरम, रिमिक्स लावणी, खंडेराया झाली माझी दैना, मोबाईल ड्रामा, आदी गाण्यांवर नृत्य केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.