Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!राज्यातील 'या' लाडक्या बहिणींना आता दरमहा मिळणार फक्त ५०० रुपये | I Love Nagar




Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!राज्यातील 'या' लाडक्या बहिणींना आता दरमहा मिळणार फक्त ५०० रुपये
Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींना आता दरमहा मिळणार फक्त ५०० रुपये

नगर : विधानसभा निवडणुकीत महायुतीची (Mahayuti) सत्ता येण्यास ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा (Ladki Bahin Yojana) मोठा हातभार लागला आहे. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा फायदा झाला. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये दिले जातात. मात्र आता काही महिलांना केवळ ५०० रुपये (Only 500 Rupees)देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनांचाही लाभ घेतात,त्यांना आता दरमहा दीड हजार रुपयांऐवजी अवघे ५०० रुपयेच मिळणार आहे.  

नक्की वाचा : मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता वाढवला!   

‘या’ महिलांना केवळ ५०० रुपये मिळणार (Ladki Bahin Yojana)

समोर आलेल्या माहितीनुसार,नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या ८ लाखांपेक्षा जास्त आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत महिलांना १२ हजार रुपये दिले जातात. यात राज्य सरकारचे ६ हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या ६ हजार रुपयांचा समावेश आहे. मात्र लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार, लाभार्थी महिलांना शासकीय योजनेमधून वर्षाला १८ हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे आता या महिलांना लाडकी बहीण योजनेत वार्षिक १८ हजार रुपयांऐवजी केवळ ६ हजार रुपयेच मिळण्याची शक्यता आहे.म्हणजेच दर महिन्याला १५०० रुपयांऐवजी केवळ५०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय अंमलात आल्यास सरकारी तिजोरीवरील १४०० कोटींचा बोजा कमी होण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा : ‘सिर्फ कश्मीर की जमीन हमारी है या…’;इमरान हाश्मीच्या ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘सरकारी योजनांचे लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही'(Ladki Bahin Yojana)

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसह इतर सरकारी योजनांचे लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही,अशी माहिती दिली होती.आता या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. माहितीनुसार,जवळपास सव्वा आठ लाख महिला या दोन योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे आता या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.






Previous articleMaharashtra Kesari Wrestling Tournament : तिसऱ्या दिवशी ७०, ७९ आणि ९२ किलो वजनी गटातील मल्लांनी गाजवले मैदान
Next articleHarshawardhan Sapkal:सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत;हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्लाबोल


Source link