Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी होणार जमा? एकत्र ३ हजार मिळणार की...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) च्या कोटीच्या संख्येतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक महिला चिंतेत होत्या. मात्र, आता या संदर्भात सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जारी केला जाणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वितरित केला जाणार आहे, म्हणजेच मार्च महिन्यात महिलांना एकूण 3000 रुपये मिळणार आहेत.



Source link