A musical program of dance, drama, music, rangoli, and Sanskar Bharati festival on the occasion of Gudi Padwa. | नृत्य नाट्य संगीत रांगोळीतून नृत्याचा सांगितीक कार्यक्रम: गुढीपाडव्यानिमित्त संस्कार भारतीचा साेहळा - Akola News
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला येथील रत्नम् लॉन्सवर नृत्य नाट्य संगीत रांगोळीच्या माध्यमातून संस्कार भारती अकोला महानगर आणि संस्कृती संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आला.
.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दीपक मोरे, संघाचे प्रमुख नरेंद्र देशपांडे, डॉ. विनायक देशमुख, डॉ. गजानन नारे, अनिता गोयंका, नेहा खंडेलवाल, नगरसेवक आशिष पवित्रकार आदी उपस्थित होते. घननीळ पाटील, मदन खुणे, राजेश्वरी देशपांडे, तनुश्री भालेराव, ऋजुता रानडे, शिवम शर्मा, अनिकेत आंबुसकर यांनी गीत गायन केले. प्रसिद्ध कत्थक नृत्यांगना राधिका साठे, अमृता जटाळे जोशी, तृप्ती बोंते यांच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. प्रवेशद्वारावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची रांगोळी भाऊलाल देवतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढली. कार्यक्रमाला संस्कार भारतीचे अकोला महानगराध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, जिल्हाध्यक्ष चंदा जयस्वाल, मातृशक्ती प्रांत प्रमुख आशा खोकले, जिल्हाप्रमुख निनाद कुलकर्णी, महानगर मंत्री महेश मोडकस आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन केले. डॉ. प्रा .स्वाती दामोदरे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश बोरकर यांनी आभार मानले.