Margao Carnival: मडगावात कार्निव्हल महोत्सवाच्या तयारीला वेग! पारंपरिक चित्ररथांना स्थान; नृत्य, संगीत, खेळांची रेलचेल | Margao Carnival 2025 starts with grand parade | Goa News In Marathi
नगरपालिका चौकात मंडप, मंच, सजावटीच्या कामाला सुरुवात झाली. त्याचबरोबर मडगावमधील कोलवा सर्कल, नगरपालिकेजवळच्या वाहतूक बेटांवर सजावट झाली असून तिथे ‘व्हीवा कार्निव्हल २०२५’ असे मोठ्या अक्षरांत लिहिण्यात आले आहे. यंदा रविवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून बोर्डा येथील होली स्पिरिट चर्चकडून कार्निव्हल मिरवणुकीला सुरुवात होणार असून ती हॉस्पिसियो, जुनी जिल्हाधिकारी इमारत मार्गाने नगरपालिका चौकात येणार आहे.
यंदा नगरसेवक कामिल बार्रेटो यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या आयोजन समितीने नगरपालिका चौकात खास कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्यात खेळ तियात्र, नृत्य, संगीत यासारख्या कार्यक्रमांचा समावेश असेल.