लांजा : केळंबे येथे २१ मार्च रोजी पालखी नृत्य स्पर्धा




लांजा : लांजा तालुक्यातील विठ्ठलादेवी ग्रामस्थ मंडळ केळंबे यांच्या वतीने शुक्रवार दि. २१ मार्च २०२५ रोजी भव्य पालखी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा केळंबे येथे रात्री ८ वाजता सुरू होणार असून, प्रथम पारितोषिक ११ हजार १११, द्वितीय पारितोषिक ७ हजार ७७७ तर तृतीय पारितोषिक ५ हजार ५५५ व इतर आकर्षण बक्षिसे देऊन स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या संघांना गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा व अधिक माहितीसाठी गावप्रमुख संपत खानविलकर, योगेश झोरे, मनोज पवार, मिलिंद पवार, पम्या गवळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विठ्ठलादेवी ग्रामस्थ मंडळ केळंबे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 18/Mar/2025







Source link