खेडमध्ये उद्या रंगणार राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा

खेड : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या स्पर्धेत ग्रुप डान्स आणि सोलो डान्स असे दोन प्रकार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्रुप डान्समध्ये प्रथम क्रमांकासाठी १५,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १०,००० रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ५,००० रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे सोलो डान्समध्ये प्रथम क्रमांकासाठी ७,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५,००० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३,००० रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही नियम व अटी आहेत.
या स्पर्धेतील सोलो डान्ससाठी ३ मिनिटांचा वेळ असेल, तर ग्रुप डान्ससाठी ५ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी साईराज खेडेकर, साहिल बुटाला, मधुर चिखले, अभिजीत चिखले, वेदांत चिखले, रोहित यादव किंवा कुंतल चिखले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 17/Feb/2025
