राधाकृष्ण नृत्य रोंबाट कलाविष्कार लक्षवेधी

कणकवली, ता.३० : येथील बाजारपेठेतील शिमगोत्सवानिमित्त कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महापुरुष मित्रमंडळ आयोजित राधाकृष्ण रोंबाट शुक्रवारची मध्यरात्र कणकवलीकरांसाठी यागदार ठरली.
राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेत भव्य दिव्य चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्काराचे एकापेक्षा एक सरस असे लक्षवेधी सादरीकरण करण्यात आले.
यात गवळण, भारूडाच्या तालावर पारंपरिक कलाविष्कराचे सादरीकरण करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बाजारपेठ, झेंडा चौक येथे हा मांड उत्‍सव झाला. या कार्यक्रमात सिद्धिविनायक तेंडोली तळेवाडी, कल्याण पुरुष तेंडोली मोरेश्वर महाडेश्वर मित्र मंडळ नेरूळ वाघचौडी, श्री देव गावडेबाक्कलेश्वर मित्र मंडळ राईवाडी, श्री देव गावडोबा मित्र मंडळ माड्याचीवाडी या संघानी राधाकृष्णनृत्य रोंबाट स्पर्धेत उंदरावर बसलेली गणपतीचा देखावा, गरुडावर बसून निघालेले संत तुकाराम महाराज, स्वामी समर्थ यांचे देखावे सादर केले. याखेरीज मोर, पोपट, बैल, गरूड, मोर, बदक, बगळा , कोंबडी आदींसह ड्रॅगन वेशभूषेने उपस्थितांची दाद मिळवली.
या स्पर्धेचे उद्‍घाटन ज्येष्ठ नागरिक अनिल मुंज यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, दिलीप पारकर, निलेश धडाम, राजेश सापळे, मंदार सापळे मुकुंद खानोलकर, दादा नार्वेकर राजू मानकर, काशिनाथ कसालकर, बाळा साबळे, सुशील पारकर, बाळा मेनकुदळे, रमेश काळसेकर, विलास बिडये, चेतन अंधारी, प्रद्युम मुंज, हरिष उचले, विकास काणेकर आदी उपस्थित होते. बाळू वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.



Source link