Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना घरात इज्जत वाढलीय..; घरी जास्त दाब टाकला तर सांगायचं, मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण : पंकजा मुंडे




Ladki Bahin Yojana सगळी सोंगं आणता येतात पैशाचं नाही म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार लाडक्या बहिणींना वाढीव मदत देण्यावरून गेल्या काही दिवसांपासून टीकेचे धनी होत आहेत. अजित पवारांचा निर्णय ही राज्याची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीसांनी सांगितलं.

आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर चार पैसे आलेत. इज्जत वाढलीय घरात. घरामध्ये जास्त कोणी दाब टाकायलं तर सांगायचं मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे. तुमचे पैसे कोणी काढून घेत नाही ना..जर कोणी काढून घेत असेल तर मला सांगा असं मंत्री पंकजा मुंडे लाडक्या बहिणींना म्हणाल्या. आज जालन्यातील बदनापूर तालुक्यातील आन्वी गावात आश्रमशाळेच्या वसतीगृहाच्या भूमीपूजनासाठी त्या आल्या होत्या. काष्टा घातलेल्या माऊलीच्या अकाउंटवर पैसे आले आणि साडी घातलेल्या महिलेच्या अकाउंटवर देखील पैसे आले. महिलांना ताकद देण्याचं काम सरकानं केलं म्हणून तर या मंचावर आहोत असंही त्या म्हणाल्या.(Pankaja Munde)

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

आश्रम शाळेच्या वसतिगृहाच्या भूमिपूजनासाठी आलेल्या पंकजाताईंनी लाडक्या बहिणींची संवाद साधला .त्या म्हणाल्या, इथे जमलेल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे आले .घरात इज्जत वाढली .आता घरात जास्त कुणी दाब टाकायला तर त्याला सांगायचं मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे .लाडक्या बहिणींना मी जगाच्या गप्पा कशाला सांगू .त्यामध्ये चार पैसे आले .घरात इज्जत वाढली .कुणी काढून घेत नाही ना तुमचे पैसे ? काढून घेत असेल तर मला येऊन सांगा असंही पंकजा मुंडे म्हणाल्या .काष्टा घातलेल्या माऊलींच्या अकाउंट वरही पैसे आले .सहावारीतल्याही महिलेच्या अकाउंटला पैसे आले .त्या महिलेला ताकद देण्याचे काम आम्ही या मंचावर बसलेलो आहोत .जिथे स्त्रीचा सन्मान होतो जो समाज महिलेला साथ देतो .असेही पंकजा मुंडे म्हणाल्या .

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदेडच्या दौऱ्यात अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेला वाढीव रक्कम देण्यास आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगत नकार दिला. त्यानंतर कर्जमाफीवरूनही आर्थिक परिस्थितीचे कारण देत 31 मार्चपर्यंत कर्ज फेडा असे सांगितल्याने विरोधकांकडून अजित पवारांवर मोठी टीका होत आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

लाडकी बहिण योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्यासाठी आम्ही नाही म्हटलं नाही. पण राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करु असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.सगळी सोंग करता येतात मात्र पैशांचं सोंग करता येत नाही. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींनी 2100 रुपये देऊ असे अजित पवार म्हणाले. शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करायचं काम सुरु असल्याचेही अजित पवार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:40 02-04-2025







Source link