200 women participate in Gangagor festival | गणगोर उत्सवात २०० महिलांचा सहभाग: रविवार पेठेमधील माहेश्वरी बालाजी महिला मंडळातर्फे आयोजन; नृत्य, गरब्याने वेधले लक्ष - Nashik News
.
शहरातील रविवार पेठेतील माहेश्वरी बालाजी महिला मंडळाचा पारंपरिक गणगोर उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम बालाजी मंदिर येथून रामकुंड व परत बालाजी मंदिर अशी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात इसर-गौरा ( शंकर-पार्वती) च्या वेशभूषेत सहभागी किशोरी व महिला तसेच मंडळाच्या सल्लागार, पदाधिकारी, कार्यकारिणीतील भगिनींसह समाजातील २०० महिला व किशोरी मंडळाच्या सदस्य सहभागी झाल्या. बैंड पथकाच्या तालात फेर धरून किशोरी व भगिनींनी नृत्य गरबा चा आनंद घेतला. मिरवणूक बालाजी मंदिर येथे समाप्त झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या अध्यक्ष वैशाली मुंदड़ा, सचिव शिल्पा लढढा, संगीता कलंत्री, सीमा भूतड़ा आदींनी विशेष परिश्रम घेतली.