'लाडक्या बहीण'च्या पैशांवरून हसतं खेळतं कुटूंब उद्घवस्त; महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

Solapur Crime। Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील दुसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिला दिनानिमित्त देण्यात आले होते.

मात्र दोन महिन्याचे हप्ते मिळणार असे सांगितले जात असतानाच खात्यात केवळ 1500 रुपये जमा झाल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर दि. 12 मार्च रोजी अनेक महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, अश्यातच एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या पैशांमुळे कुटुंबात कलह झाल्याची घटना घडली आहे. पत्नीला मिळालेल्या लाडक्या बहिण योजनेच्या पैशांवर तिच्या पतीनेच डल्ला मारला आणि ते दारूसाठी खर्च केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे पैसै दारूवर का खर्च केले? असा जाब विचारणाऱ्या महिलेवर तिच्या दारूड्या पतीने आणि सासूने थेट कोयत्याने हल्ला केल्याचा भयानक प्रकारही घडला आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितानुसार, माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील लोणी गावातील हा भयानक प्रकार घडला आहे. तेथे राहणाऱ्या एका महिलेला दरमहा या योजनेचे 1500 रुपये मिळतात. घरखर्चासाठी जपून पैसे वापरण्याचा त्या महिलेचा प्रयत्न होता.

मात्र तिच्या पतीला दारूचे व्यसन आहे. आणि त्यातूनच त्याने हे भयाक कृत्य केलं. निशा लोंढे असं मारहाण झालेल्या विवाहितेचं नाव असून, पती धनाजी लोंढे आणि सासू रूपाबाई लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.

निशा यांना ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च असे दोन महिन्यांचे पैसे मिळाले होते. मात्र, पतीने हे पैसे परस्पर काढून घेतले. त्यानंतर माझे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्ही का काढले? असं पत्नी निशा हिने जाब विचारलं आणि त्याला त्याचाच राग आला.

त्याच रागातून त्या पतीने आणि त्याच्या आईने मिळून, महिलेवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली असून मोठी खळबळ माजली. त्यानंतर पीडित महिलेने कुर्डूवाडी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली.

त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेचा पती आणि सासू य दोघांविरोधातही ३२६ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे योग्य हातात जाणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

2100 रुपयांचं काय झालं? पाहा….

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी 2100 रुपये देऊ असे म्हटले होते. मात्र आता यावरून सरकारने घूमजाव केला आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यात याबाबत काही घोषणा होण्याची शक्यता होती.

मात्र लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावर्षी जी तरतूद करण्यात आली, तेवढ्याच रकमेची तरतूद 2025-26 वर्षासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहीणींना 2100 रुपये मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

Source link