महेंद्रसिंग धोनी चेन्नईला विजयपथावर आणणार? कोलकाताच्या अजिंक्य सेनेशी मुकाबला – ryan

ऋतुराज गायकवाड हाठी महत्त्वाचा फलंदाज होता. कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो उर्वरित हंगामात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ऋतुराजच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंग संघ संघाचं नेतृत्व करणार आहे. दरम्यान ऋतुराजच्या ऐवजी कोणत्या खेळाडूची निवड करणार यासंदर्भात चेन्नईने घोषणा केलेली नाही. ऋतुराजऐवजी पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, आयुष म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आहे. मयांक अगरवालकडे आंतरराष्ट्रीय तसंच आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव आहे. मुंबईकर युवा आयुष म्हात्रेला चेन्नईने ट्रायल्ससाठी बोलावलं होतं. पृथ्वी शॉ याच्यासाठी लिलावात बोली लागली नव्हती. याव्यतिरिक्त काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावंही चर्चेत आहेत.

Source link