दोन दिवसांत लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार! २१०० रुपये जाहीर होणार? |ladki bahin yojana update 2100 rupees installment announcement soon in 2 days budget 2025 |Saam Tv
लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत संभ्रम
लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत आदिती तटकरेंनी मोठं विधान केलं होतं. लाडक्या बहिणींना यावर्षी २१०० रुपये देऊ, अशी कोणतीही घोषणा आम्ही केली नव्हती. जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात २१०० रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे.