‘तो विमान गो’गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा कमाल डान्स; पाहा हा भन्नाट व्हिडीओ - Marathi News | Girls dance to the song 'To To Viman Go' in Mumbai local

मुंबई लोकल ट्रेनशिवाय आपण कल्पनाच करू शकत नाही. कारण जर लोकल ट्रेन बंद तर सगळंच ठप्प झाल्यासारख होतं. रोज लाख, करोडो लोक लोकलमधून प्रवास करतात. गर्दी, धक्काबुक्की, सीट मिळवण्याची धडपड हे जरी नेहमीचच असलं तरी लोकलशिवाय सगळंच अडून राहतं. पण कधीकधी याच लोकलच्या गर्दीत मुंबईकर आपला विरंगुळाही शोधतातच. जसं की भजन, किर्तन करणे किंवा फिल्मी गाण्यांवर डान्स, रील्स करणे असे अनेक व्हायरल झालेले व्हिडीओ देखील आपण पाहिले असतीलच.

मुंबई लोकलमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल 

असाच एक मुंबई लोकलमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये काही तरुणींनी लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या गाण्यावर थिरकायला लागाल. ‘तो तो विमान गो उडतोय आकाशात गं…’ या गाण्यावर तरुणींनी केलेला हा भन्नाट डान्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘तो तो विमान गो’ हे गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे. अगदी सोशल मीडियावरील रील्सपासून सर्वत्र या मराठी गाण्यावरील व्हिडीओ आणि रील्स पाहायला मिळतायत.

‘तो तो विमान गो उडतोय आकाशात गं’ गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स 

मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एकूण तीन तरुणी या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. लोकल रिकामी असून तरुणी या गाण्यावर रील बनवताना दिसत आहेत.एकही स्टेप्स न चुकवता या तरुणी परफेक्ट डान्स करताना पाहून सर्वच जण या तरुणींचं कौतुक करत आहेत. ‘तो तो विमान गो उडतोय आकाशात गं’ या मराठी गाण्यावर त्या डान्स करत आहेत. लोकल रिकामी असल्यानं त्यांना मोकळी जागा मिळाली आणि याचा या तरुणींनी पुरेपूर उपयोग करून घेतला.

हजारो लाईक्सही आणि कमेंट्स

तरुणींच्या डान्सचा व्हिडिओ bunny97_x’s नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.सध्या हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलेला आहे आणि हजारो लाईक्सही आणि कमेंटही लोकांनी केले आहेत. शिवाय हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरलेला आहे.



Source link