डेडलाइनला उरले फक्त १२ तास, लाडक्या बहिणींच्या खात्यात आज मार्चचा हप्ता येणार? |ladki bahin yojana only 12 hours left for march installment know when will women recieve 1500 rupees| Saam Tv
लाडक्या बहिणींना एकाच महिन्यात दोन हप्ते
लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात ३००० रुपये देण्यात येणार आहे. महिला दिनाच्या मूहूर्तावर फेब्रुवारीचा हप्ता दिला होता. ७ मार्च ते १२ तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता देण्यात येणार आहे. दोन टप्प्यांमध्ये हे पैसे दिले जाणार असल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले होते.
आज १२ मार्च आहे. त्यामुळे आजच्या दिवसात सर्व महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येण्यास विलंब झाला आहे. महिलांच्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच पैसे येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, आता लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.