खजुराहोमध्ये 139 कलाकारांचा सलग 24 तासांचा नृत्य विक्रम
भोपाळ : जगभरात अनेक सामूहिक विश्वविक्रमही होत असतात. आता मध्य प्रदेशातील खजुराहोमध्ये 139 कलाकारांनी सलग 24 तास नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला आहे. खजुराहो नृत्य महोत्सवाच्या पहिल्या दिवशी हा नृत्याचा विश्वविक्रम करण्यात आला. येथे 139 कलाकारांनी 24 तास 9 मिनिटे आणि 26 सेकंद सतत सादरीकरण केले. यावेळी कलाकारांनी कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, मोहिनीअट्टम आणि ओडिसी नृत्य सादर केले. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या अधिकृत टीमने मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना शास्त्रीय नृत्य मॅरेथॉन रिलेचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.