आंबेशेत घोसाळेवाडीत २१ मार्चला भव्य पालखी नृत्य स्पर्धा

आंबेशेत घोसाळेवाडीत पालखी नृत्य स्पर्धा
शुक्रवारी आयोजन ; विजेत्यांचा होणार सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : शहराजवळील आंबेशेत घोसाळेवाडी येथे सालाबाद प्रमाणे शिमगोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २१ मार्चला हा उत्सव साजरा होत आहे. पालखी नृत्य स्पर्धा हे या शिमगोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या पालखी नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट पालखी नृत्य पारितोषिक म्हणून प्रथम क्रमांकाचे २१ हजाराचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. शिमगोत्सवानिमित्त प्रत्येक गावची ग्रामदेवता भक्तांच्या भेटीला मंदिरातून बाहेर पडली आहे. या निमित्त गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आंबेशेत येथील घोसाळेवाडी येथे देखील मागील अनेक वर्षे शिमगोत्सवात पालखी नृत्य उत्सवाचे आयोजन करण्याची परंपरा जोपासली गेली आहे.
या वर्षी २१ मार्चला हा पालखी नृत्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. शिवशक्ती मित्रमंडळ रत्नागिरी आंबेशेत घोसाळेवाडी यांच्याकडून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो भाविक या पालखी उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी घोसाळेवाडी आंबेशेत येथे हजेरी लावतात. या वर्षी पालखी नृत्य पारितोषिक देण्यात येणार आहे. या नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक २१००० व चषक, द्वितीय १५००० व चषक, तृतीय ११००० रोख बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. या पालखी नृत्य स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्या मंडळांनी नियम व अटी जाणून घेण्यासाठी अनिल घोसाळे, अमोल घोसाळे, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
—-
स्पर्धेला होते गर्दी
आंबेशेत घोसाळेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे शिमगोत्सव आयोजित केला जातो. या उत्सवात पालखी नृत्य स्पर्धा हे मुख्य आकर्षण असते. यंदाही ही स्पर्धा शुक्रवारी होणार आहे. ती पाहण्यासाठी भाविकांसह चाकरमान्यांची मोठी गर्दी होते.



Source link