किन्हवली(बातमीदार)ः गुढीपाडव्याच्या निमित्ताने अस्नोली युवामंच संस्थेने राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा भरवली होती. या स्पर्धेत शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, ठाणे, मुंबई, नाशिक, कर्जत, अहिल्यानगरातील हौशी नृत्य कलाकारांनी सहभाग घेतला होता. भिवंडी ‘चिल्लर पार्टी’, कल्याणच्या ‘झिरो डिग्री डान्स’ नृत्य समूहाला प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक जय हनुमान कलामंच उरण, तृतीय पारितोषिक रौद्र कलामंच ठाणे, चतुर्थ पारितोषिक ‘एमएच ०५ कल्याण’ आणि पाचवे पारितोषिक आर्या बोंद्रे व पायल भेरे यांना देण्यात आला. नेहा पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर साकारणारे डॉ.राजेंद्र चौधरी, मार्गदर्शक हभप डॉ. कैलास निचिते यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
function fbPixel (){
!function(f,b,e,v,n,t,s)
{if(f.fbq)return;n=f.fbq=function(){n.callMethod?
n.callMethod.apply(n,arguments):n.queue.push(arguments)};
if(!f._fbq)f._fbq=n;n.push=n;n.loaded=!0;n.version='2.0';
n.queue=[];t=b.createElement(e);t.async=!0;
t.src=v;s=b.getElementsByTagName(e)[0];
s.parentNode.insertBefore(t,s)}(window, document,'script',
'
fbq('init', '131893666558789');
fbq('track', 'PageView');
}
Source link